Posted in

महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी योजना 2026.कोण पात्र कोण अपात्र![2026]

महाराष्ट्र विधानसभा मध्ये 6 मार्च 2026 रोजी मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे.यामध्ये 2,00,000 रुपये पर्येंत चे पीककर्ज माफ करणे व नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन राशी चा लाभ देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026’ जाहीर करण्यात आली आहे.

कर्जमाफी साठी निकष काय असावे यासाठी एक समिती गठीत केलेली आहे याद्वारे 28-30 लाख शेतकऱ्यांची माहिती गोळा केली जाईल. ही समिती पुढील 20-25 दिवसात आपला अवहाल सादर करणे अपेक्षित आहे.

2026-27 सालासाठी 7 लाख 69 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करताना 5 ट्रेलिअन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष ठेवण्यात आले आहे.

महत्वाचे मुद्दे.

शेतकरी कर्जमाफी योजना 2026 पात्रता काय असणार.

कृषी प्रोत्साहन योजनेचा लाभ कोणाला.

कर्जमाफी योजनेचा कालावधी कधीपासून ग्राह्य धरण्यात येईल.

शेतकरी कर्जमाफी योजना 2026 साठी कोण अपात्र.

शेतकरी कर्जमाफी 2026 बद्दल शेतकऱ्याचे महत्वाचे प्रश्न.

शेतकरी कर्जमाफी योजना 2026 कोणाला लागू होईल.

राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ग्रामीण बँक, विविध कार्यकारी संस्था यांच्या कडून घेतलेली पीककर्ज आणि पुनर्रघटीत कर्ज माफ केले जाणार आहे.

असंघटित क्षेत्रातून(सावकार,आडात व्यापारी) घेतलेले कर्ज या कक्षेत येत नाहीत.

फक्त पीककर्ज माफ केले जाईल,व्यक्तिगत कारणासाठी घेतलेले कर्ज माफ केले जाणार नाहीत.   

नियमित कर्जाची परतफेड करणार्यांना 50 हजार रुपये कृषी प्रोत्साहन.

पिककर्जाची उचल घेऊन नियमित व बँकांनी ठरवून दिलेल्या मुदतीआधी कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन राशी चा लाभ भेटणार आहे.

नियमित कर्ज परतफेड चा कालावधी काय असेल हे समिती कडून अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही, पण मागील कर्जमाफी चा विचार करता गेल्या 3 आर्थिक वर्षापैकी किमान 2 आर्थिक वर्षात नियमित व विहित कालावधीत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता.

या वर्षी ही 2023-24, 2024-25, 2025-26 या कालावधी पैकी किमान 2 आर्थिक वर्षात नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यांना याचा लाभ देण्यात येईल.

कर्जमाफी 2026 साठी योजनेचा कालावधी कधीपासून ग्राह्य धरण्यात येईल.

शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत चे कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे,पण याचा कालावधी कधीपासून ग्राह्य धरण्यात येणार आहे या बद्दल समितीने स्पष्टीकरण दिलेले नाही.

2019 च्या कर्जमाफी वेळी कर्जमाफी साठी ग्राह्य कालावधी 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 असा ठेवण्यात आलं होता, यावेळी ही 1 मार्च 2021 ते 30 सप्टेंबर 2025 असणे अपेक्षित आहे. 

कर्जमाफी 2026 योजनेचा लाभ कोणाला भेटणार नाही.

आजी माजी मंत्री, आमदार व खासदार.

केंद्र शासन,राज्य शासनाचे कर्मचारी(25,000 पेक्षा जास्त वेतन असणारे कर्मचारी,चतुर्थश्रेणी कर्मचारी वगळून).

महाराष्ट्र शासनामार्फत चालवण्यात येणाऱ्या उपक्रमावर कार्यरत असणारे अधिकारी,कर्मचारी(25,000 पेक्षा जास्त वेतन असणारे कर्मचारी,चतुर्थश्रेणी कर्मचारी वगळून).

सहकारी साखर कारखाने,कृषी उत्पन्न बाजार समिती,सहकारी दूध संघ,नागरी सहकारी बँक,सहकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ,अधिकरी व कर्मचारी ज्यांचे वेतन 25000 पेक्षा जास्त आहे.

25,000 पेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेणारे व्यक्ती.

शेती उत्पन्नव्यतिरिक्त आयकर(Income Tax) भरणारे व्यक्ती.

महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी 2026 बद्दल शेतकऱ्याचे महत्वाचे प्रश्न

दोन लाख च्या पुढे कर्ज असेल तर कर्जमाफी होईल का?

दोन लाखाच्या पुढे कर्ज असेल तर 2 लाखाच्या वरची रक्कम शेतकऱ्याने बँकेत जमा करून या योजनेचा लाभ घेता येईल. उदाहरण- एका शेतकऱ्यावर 2,20,000 चे कर्ज आहे, वरील 20 हजार रक्कम बँकेत भरून या योजनेसाठी पत्र होऊ शकतो.

कर्जमाफीचा फायदा लहान शेतकऱ्यांना की मोठ्या शेतकऱ्यांना?

या योजनेमध्ये लहान-मोठा शेतकरी असा भेदभाव करण्यात आलेला नाही, ज्यांनी नोंदणीकृत संस्था कडून कर्ज घेतले आहेत ते सर्व शेतकरी 2 लाख रुपये पर्यंत कर्जमाफी योजनेसाठी पात्र आहेत. 

एक पेक्षा जास्त बँक कडून कर्ज घेतले असतील तर!

एक किंवा अनेक बँक कडून कर्ज घेतली असतील तर त्यांची एकत्रित कर्जाची रक्कम पैकी 2 लाख कर्जमाफी च्या कक्षेत येईल,त्यावरील रक्कम कर्जदारास भरावी लागेल.

एक पेक्षा जास्त बँक कडून पीककर्ज घेऊन नियमित परतफेड ही केली तर कृषी प्रोत्साहन प्रत्येक बँक खात्याला 50,000 राहिला का?

एक किंवा अनेक बँक कडून अल्पकालावधीचे घेतलेले कर्ज व निआयमित परतफेड यांची एकत्रित रक्कम विचारात घेता कमाल(जास्तीत जास्त) 50,000 रुपये प्रोत्साहन राशी असेल.

कर्जमाफी चा फायदा शेतकऱ्यांना की बँकांना?

सामान्य लोकांमध्ये भ्रम आहे की कर्जमाफी चा फायदा फक्त बँकांना होतो शेतकऱ्यांना होत नाही,पण कर्जमाफी मुळे 2 लाख पर्येंत चे पीक कर्ज माफ होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल त्याचबरोबर थकीत कर्जामुळे बँकेची आर्थिक परिस्थिती खराब आहे ती ही सुधारण्यास मदत होईल,आणि एक प्रकारे बँकिंग व्यवसायासाठी Push भेटेल.

कर्जमाफी 2026 समिती चे नवीन निकष,नियम,अटी याबद्दल नवीन Updates आम्ही आपल्याला कळवू.

धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *