Posted in

ऊस खोडकीडा नियंत्रणासाठी आळवणी योग्य की फवारणी[2026]

वातावरणातील बदलामुळे ऊस पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे.वेळीच खोडकिडीसाठी उपाययोजना केल्या नाहीत तर उत्पादनात 20 टक्के व साखर उताऱ्यात 1.5% घट दिसू शकते. ऊस पिकावरील खोडकिडीच्या नियोजनासाठी पर्याय काय आहेत आणि आळवणी (Drenching) किंवा फवारणी यापैकी Best Result कशाचा येईल ते जाणून घेऊयात Lets Start.

महाराष्ट्रात जसा उन्हाळा वाढत जातो तसा ऊस खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढत जातो,यापासून बचाव होण्यासाठी मार्च नंतर लागण करू नये.

ऊस खोडकीड नियंत्रण महत्वाचे मुद्दे

  • ऊस खोडकीड नियंत्रणासाठी (कोराजन)Chlorantraniliprol 18.5% SC.
  • ऊस खोडकीड नियंत्रणासाठी क्लोरो 20%/50%.
  • ऊस खोड नियंत्रणासाठी आळवणी करावी की फवारणी?
  • ऊस खोडकीड नियंत्रणासाठी क्लोरो की कोराजन?
  • ऊस खोडकीड नियंत्रणासाठी आळवणी/फवारणी चे प्रमाण.
  • ऊस खोडकीड नियंत्रणासाठी उपलब्द पर्याय.
  • Conclusion.

ऊस खोड कीड नियंत्रणासाठी Clorantraniliprol 18.5%(कोराजन).

Organophosphate गटातील औषधाच्या तुलनेत सध्या उपलब्द असलेल्या पर्यायापैकी Chlorantraniliprol(कोराजन) ची परिणामकारकता जास्त आहे.

सर्व प्रकार च्या आळी आणि वाळवी वर चांगले प्रभावी आहे.

तुलनेने नवीन औषध असल्यामुळे अधिक काळासाठी याचा परिणाम जाणवतो, त्याचबरोबर मित्रकीटकांसाठीही कमी हानिकारक आहे.

Chlorantraniliprole च्या Unique Mode of Action मुळे याचे result क्लोरो च्या तुलनेत Better येतात.

ऊस खोड कीड नियंत्रणासाठी क्लोरो (Chloro 20% किंवा Chloro 50%)

भारतामध्ये 1980 पासून Oragnophospahte गटातील Chloropyriphos 20% / 50% यांचा वापर वेगवेगळ्या कीड नियंत्रणासाठी केलं जात आहे.

गेली 40-45 वर्ष या घटकांचा वापर होत असल्यामुळे खोड कीड क्लोरो कीटकनाशक साठी काही प्रमाणात प्रतिकारक्षम झाली आहे.

क्लोरो चा मित्रकिटकांवर घातक परिणाम होत असल्यामुळे पर्यावरणावर ही वाईट परिणाम होतात.

ऊस खोडकीड नियंत्रणासाठी आळवणी करावी का फवारणी?

खोडकीडा जर नुकताच अंड्यातून बाहेर निघाला असेल आणि त्याने खोडात प्रवेश केला नसेल,तर फवारणी काही प्रमाणात चांगला Result देईल, पण जर खोडकिडीने खोडात प्रवेश केला असेल तर फवारणी चे औषध खोडापर्येंत पोहचणार नाही.

फवारणी मध्ये आंतरप्रवाही(Strong Systemic)औषध वापरून म्हणावे असे Results भेटणार नाहीत.

आळवणी केल्याने औषध खोडकिडीचा प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात जाते आणि जरी खोडकिडीने खोडात प्रवेश केला असेल तरीही आळवणी चे चांगले परिणाम भेटतात.

ऊस खोडकिडा नियंत्रणासाठी आळवणी चे परिणाम चांगले दिसून येतात.

आळवणी साठी क्लोरो वापरावे की कोराजन(Clorantraniliprol 18.5% SC).

क्लोरो ची कार्यपद्धती.

क्लोरो हे स्पर्शजन्य व पोटविष(Contact&Stomach Poison) प्रकारातील औषध आहे

खोडकिडीवर चांगला परिणाम दिसण्यासाठी क्लोरो हे Direct आळी च्या संपर्कात आले पाहिजे किंवा तिने फावरलेले पानं खाल्ले पाहिजे, पण खोडकीड ही खोडाच्या गाभ्यात असते त्यामुळे खोडकिडीचा  औषधाशी Direct संपर्क येत नाही.

क्लोरो ची गॅस बनवण्याची क्षमता (Fumigant Action) असूनही गाभ्यातील खोडकिडीवर याची परिणामकारकता दिसून येत नाही.

Chloropyriphos कीटकनाशक हे Organophosphate गटातील औषध आहे जे मित्रकीटकांसाठी घातक सिद्ध होत आहे.

कोराजन ची कार्यपद्धती.

कोराजन हे Contact& Stomach Poison गटातील औषध आहे, कोराजन ची आंतरप्रवाही(पानांच्या पेशी मधून वाहन होण्याची क्षमता) क्षमता जास्त असल्याने ते खोडापर्येंत जाते.

Chlorantraniliprol हे औषध जमिनीवर जरी पडले तरी झाडाच्या Xylem पेशी कडून ही काही प्रमाणात त्याचे वाहन रोपमध्ये होते.

क्लोरो च्या तुलनेत नवीन औषध असल्याने कोराजन चे Result ही चांगले येतात.

Chlorantraniliprol कीटकनाशका बद्दल किडींमध्ये प्रतिकारक्षमता तयार झाली नसल्याने तुलनेने याचे परिणाम चांगले भेटतात.

Chlorantraniliprol 18.5%SC वापरण्याचे प्रमाण.

ऊस लागणी नंतर 60 दिवसापर्यंत – 150 ml / 400 लिटर पाणी आळवणी करणे.

ऊस लागणी नंतर 90-100 दिवसापर्यंत- आळवणी करणे शक्य नाही त्या ठिकाणी बुडामध्ये/सुरळीमध्ये फवारणी करावी.

आळवणी कोरड्या जमिनीत करावी व नंतर पाणी द्यावे.

ऊस खोड कीड नियंत्रणासाठी उपलब्द पर्याय.

  • Chlorantraniliprole 0.4% GR एकरी 8 किलो.
  • Fipronil 5% SC 3-4 ml/लिटर पाणी.
  • Flubendamide 20% WDG 0.5 gm/लिटर पाणी. 
  • Thiamethoxam 75% SG 0.25-0.30 gm/लिटर पाणी.
  • Chloropyriphos 20%/50%-2 ml/लिटर (वापर टाळावा).

Conclusion.

आपल्याला वरील माहिती फायदेशीर वाटली असेल तर Like करा आपल्या मित्रांना Share करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *